लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रस्ते अपघातांवर तसेच अपघातांमध्ये होणाºया मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. बी. एस. हरण, सहाय्यक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अर्विंत राठोड, उप शिक्षणाधिकारी आर. पी. ठाकूर आदी उपस्थित होते.मिश्रा म्हणाले, रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. शिक्षण विभागामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याबाबत यापूर्वीच सूचना करण्या आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन वाहनचालकांवर होणाºया कारवाईबाबत माहिती देण्यात यावी. वाहतूक नियमांविषयी जनजागृती होत असताना वाहतूक नियम मोडणाºयांविरुद्ध मोहीम सुद्धा तीव्र करण्यात यावी. तसेच वाहतूक पोलीस व परिवहन विभागाच्यावतीने संयुक्तरित्या विशेष तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी यावेळी केल्या. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉटवर करण्यात आलेल्या कायार्वाहीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाईहेल्मेट न वापरणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, विमा प्रमाणपत्र नसणे, विना अनुज्ञप्ती वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ओव्हर स्पीडिंग वाहन चालविणे, कर्कश हॉर्न वापरणे, विना नोंदणी वाहन चालविणे, ओव्हरलोडिंग वाहन चालविणे, योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे आदी गुन्ह्यानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे सय्यद यांनी यावेळी सांगितले. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीरस्ते वाहतूक सुरक्षिततेसाठी दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी दिल्या.