लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन मागणीनुसार शेतकऱ्यांना रास्त भावात दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना सोमवारी दिल्या. वाशिम पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे २७ मे रोजी आयोजित खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणात कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विकास अधिकारी प्रल्हाद शेळके, मोहीम अधिकारी नरेंद्र बारापात्रे, वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, कृषी व्यवसायिक संघटनेचे राज्य अध्यक्ष जगनाथ काळे, सुभाष दरक, जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचे संचालक उपस्थित होते.जिल्ह्याच्या मागणीनुसार बियाणे आणि खते उपलब्ध होत असून, शेतकºयांची गैरसोय किंवा फसवणूक होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी अशा सूचना उपस्थित कृषी अधिकाºयांनी दिल्या. अनुदानित खते वितरण करताना पॉस मशिनचाच वापर करावा, किटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी, बंदी घातलेले किटकनाशके व त्याबाबतचे नियम, गुलाबी बोंड अळीपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, मका पिकावरील नव्याने येऊ घातलेल्या अळीबाबत जनजागृती आदी विषयांवर दत्तात्रय गावसाने, प्रल्हाद शेळके, नरेंद्र बारापात्रे आदींनी मार्गदर्शन केले. पॉस मशिनबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. खरिप हंगाम तोंडावर आला असून प्रत्येकाने शेतकºयांच्या सेवेसाठी सज्ज राहावे, अशा सूचनाही कृषी अधिकाºयांनी दिल्या. गैरहजर संचालकांना कारणे दाखवा२७ मे रोजी वाशिम पंचायत समितींतर्गत येणाºया कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांना खरिप हंगामपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून, या प्रशिक्षणाला सर्व केंद्र संचालकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या होत्या. काही संचालक या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले नसल्याची बाब निदर्शनात आली. प्रशिक्षणाला गैरहजर राहणाºया संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी दिली.
शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 3:03 PM