वाशिम : मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्या जात आहे.जिल्हय़ात विविध कॉलनीमध्ये पतंगोत्सव सुरू झाला असून, आकाशात मोठय़ा प्रमाणात पतंग उडताना दिसून येत आहेत; मात्र पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा, मांजा घातक असून, मांजामध्ये विविध रासायनिक द्रव्य, काच टाकल्या जात असल्याने ते आरोग्यास धोकादायक आहे. पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोर्याने अनेकांची बोटे कापली जात आहेत. पतंग उडविताना तो उत्सव म्हणून साजरा करा, असे आवाहन मारवाडी युवा मंच, निसर्ग युवा मित्र मंडळासह विविध संघटनाकडून केल्या जात आहे. तसेच याबाबत जनजागृतीही केल्या जाणार आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) शरीरासाठी घातक असल्याने याचा वापर टाळावा व कपडे शिवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोर्याचा वापर करावा. या संदर्भात मारवाडी युवा मंच शहरात फलके लावून जनजागृती करणार असल्याचे सागितले.
पतंग उडविताना खबरदारी घ्या
By admin | Published: January 13, 2015 1:06 AM