नंदकिशाेर नारे
वाशिम : गाव विकासासाठी राजकारण बाजुला सारत गावातील नागरिक एकत्र येऊन गावाचा विकास साधत असल्याचे चित्र मंगरूळपीर तालुक्यातील तपाेवन या छाेट्याश्या गावात दिसून येत आहे. खेडेगावात अनुचित प्रकारांना आळा बसावा, गावात घाण करणाऱ्यांवर अंकुश रहावा यासह ईतर बाबी लक्षात घेऊन गावात सीसीटीव्ही कॅमेराव्दारे नजर ठेवल्या जात आहे. सीसीटीव्ही असणारे जिल्ह्यातील तपाेवन एकमेव गाव दिसून येत आहे.
तपाेवन येथे लाेकसहभागातून माेठ्या प्रमाणात गावकरी एकत्र येत आहेत. या गावामध्ये शहरात नसलेल्या सुविधा आपणास पहावयास मिळत आहेत. प्लेव्हर ब्लाॅकचे रस्ते, जागाेजागी वृक्षाराेपण, भूमिगत गटार याेजना, जागाेजागी कचरा कुंड्या, आसन यासह बऱ्याच सुविधा लाेकसहभागातून करण्यात आल्या आहेत. समृध्द गाव स्पर्धेअंतर्गतही माेठ्या प्रमाणात गावात कामे झाली आहेत. ६ कि.मी. नाला खाेलीकरणाकरिता ग्रामस्थांनी तब्बल ८ लाख रुपये वर्गणी करून गावातील एकजूट दाखवून दिली आहे. या गावामध्ये फेरफटका मारल्यास आपणास पिण्याचे पाणी, समाज मंदिर, वृध्दांसाठी गावात बसण्यास बेंच, ग्रामपंचायत परिसरात शाैचालय, सामाजिक सभागृह, दवंडी देण्यासाठी लाऊड स्पीकर व्यवस्था, मंदिरासमाेर डाेमच्या सुविधेसह अनेक विकास कामे या गावात दिसून येतात. नाही तर आजही अनेक गावामध्ये प्रवेश करताच हगणदरीचे दर्शन हाेताना आपण पाहताे. या गावाच्या ऐकीमुळे हे शक्य झाल्याचे ग्रामस्थ बाेलताहेत.
..............
१० कॅमेऱ्यांसह दाेन डीव्हीडी, दाेन माॅनिटरव्दारे गावावर वाॅच
गावात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी एकूण ७० हजार रुपयांच्या जवळपास खर्च करण्यात आला आहे. यामधून गावात विविध भागात १० कॅमेरे, दाेन डीव्हीडी व दाेन माॅनिटर बसवून संपूर्ण गावात वाॅच ठेवण्यात येत आहे.
गावात उभारण्यात येत असलेल्या ३ शेततळ्यासांठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ८ लाख रुपये लाेकवर्गणी केली आहे.
गावातील नागरिकांना माेफत धान्य दळून दिल्या जाते. त्याने कराचा भरणा केलेला असावा.
..............
तपाेवन येथील दिव्यांग मंगेशचे जलसंधारणात सक्रिय सहभाग
एक हात नसताना जलसंधारण कामात सहभाग घेऊन अख्या महाराष्ट्रात गाजणारा दिव्यांग तरुण मंगेश अशाेक सावळे तपाेवन येथीलच रहिवासी असून एक हात नसताना त्याने पाणी फाउंडेशनमध्ये जलसंधारणाच्या कामाला हातभार लावला हाेता.
लाेकसहभागासाठी गावातील महिलाही सरसावलेल्या आपल्याला या गावात दिसून येतात. गावात सभा मंडपाचे काम करण्यात आले तेव्हा गावातील अनेक महिलांनी सहभाग घेऊन गावातील एकाेपा दाखवून दिला हाेता. या सभामंंडपाच्या कामात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केले.
...............
काेणतेही राजकारण न करता गावासाठी झटल्यास गावकरीसुध्दा साेबत राहतात हा माझा अनुभव आहे. त्यामुळे गावात काेणतेही कार्य करण्याचे ठरविले की नागरिक स्वत:हून पुढे येतात. अनेक कामे लाेकसहभागातून हाेत आहेत.
-शरद पाटील येवले,
सरपंच, तपाेवन ता. मंगरूळपीर