लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी होळी सणानिमित्त वाशिम जिल्ह्यात साखरपासून तयार होणाºया गाठ्यांची विक्रमी विक्री केली जाते. यामाध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. दरम्यान, पारंपरिक पद्धतीने गाठी तयार करण्याच्या कामात सद्या भोई समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.होळी सणानिमित्त एकमेकांना साखरपासून तयार होणाºया गाठीचा हार देण्याची जुनी परंपरा आजही वाशिम जिल्ह्यात कायम आहे. त्यामुळे होळी सणाच्या तीन ते चार दिवसांआधीच गाठी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. हा व्यवसाय प्रामुख्याने भोई समाज करित असून वाशिमसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गाठी पोहचविण्यात येत असल्याची माहिती या व्यवसायातील राजू सहातोंडे, अनिल सहातोंडे, संतोष सहातोंडे, किशोर सहातोंडे यांनी दिली.
होळीनिमित्त पारंपरिक गाठ्या बनविण्याचे काम तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 4:51 PM