कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात खाद्यतेलासह सर्वच प्रकारच्या किराणा साहित्याचे दर जणू गगनाला भिडले होते. त्यात मसालाही अपवाद राहिला नाही. चालू वर्षी मार्च, एप्रिल या महिन्यात मसाल्यांच्या दरांत साधारणत: १० टक्के वाढ झाली होती. त्याचा फारसा परिणाम झाला नाही; मात्र सध्या काही मसाला पदार्थांचे दर दुपटीने वाढले असून मासिक बजेट कोलमडल्याचा सूर गृहिणींमधून उमटत आहे.
..........................
असे वाढले दर...
मसाला जुने दर नवीन दर
धने - ८०/११०
बदामफूल - ८०/११०
काळीमिरी - ७२०/७६०
जिरे - १८०/२००
लवंग - ४५०/५६०
....................
महागाई पाठ सोडेना !
कोरोनातून दिलासा मिळाला; मात्र महागाईने हैराण करून सोडले आहे. किराणा साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. खाद्यतेल, साखर, चहापत्ती, डाळी, तांदूळ आणि आता मसाल्याचे दरही वाढले असून महागाई काही केल्या पाठ सोडत नसल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे.
- रूपाली शिंदे
...............
आठवड्यातून पाच ते सहा वेळा स्वयंपाकात मसाला फोडणीची भाजी ठेवावीच लागते; मात्र सर्वच प्रकारच्या मसाला पदार्थांचे दर सध्या वाढले असून किराणा मालाकरिता राखून ठेवत असलेल्या मासिक आर्थिक बजेटमध्ये वाढ झालेली आहे. महागाईवर नियंत्रणासाठी प्रयत्न व्हायला हवे.
- आशा कांबळे
...........................
...म्हणून वाढले मसाल्यांचे दर
कोरोना संकटकाळात किराणा साहित्यासह मसाले पदार्थांच्या दरातही ५ ते १० टक्के वाढ झाली होती. गेल्या काही महिन्यांत वाहतूक खर्चात वाढ झाल्याने त्यात पुन्हा दरवाढ झाली आहे.
- श्रीनिवास बत्तुलवार
...............
मसाल्याचे सर्वच घटक इतर जिल्ह्यांतून आयात करावे लागतात. गेल्या काही महिन्यांत डिझेलचे दर वाढल्याने मसाला दरांतही वाढ झालेली आहे. ग्राहकांवर मात्र विशेष परिणाम नाही.
- सचिन खडसे