लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न सुटणे अशक्य झाल्याने शिक्षक आक्रमक झाले असून येत्या ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी बैठक ठेवण्यात आली आहे. त्यात लिखीत स्वरूपातील समस्यांचा पाढा वाचला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी सांगितले, की वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. समस्या निकाली काढण्याकामी शिक्षणाधिकारी किंवा शालेय शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने येत्या ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेदरम्यान शैक्षणिक संस्थांनी रुजू न केलेले अनुदानित अतिरिक्त शिक्षक यांच्या वेतनाचा प्रश्न, उच्च न्यायालयातून अंतरीम आदेश मिळालेल्या २००५ पुर्वी नियुक्त सर्वच शिक्षकांचे जीपीएफ खाते सुरु करणे व डीसीपीएसमधील अडचणी, शिक्षकांचे सेवासातत्य, दुय्यम सेवा पुस्तक मिळण्यासंदर्भातील चर्चा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करने, जीपीएफच्या पावत्या मिळवून देणे, डीसीपीएसमध्ये जी कपात करण्यात आली त्याचा हिशेब मिळवून देणे, मेडिकल बिले, वरिष्ठ व निवड श्रेणीचा प्रश्न, २० टक्के अनुदानीत शाळांचा प्रश्न, १ व २ जुलै रोजीच्या शाळांचा प्रश्न, शैक्षणिक सत्र २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये नैसर्गिक वाढ मिळालेल्या तुकड्यांना अनुदान मिळवून देणे, २ मे २०१२ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा प्रश्न, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान तसेच इतरही काही संबंधित प्रश्नांवर शिक्षणाधिकाºयांशी चर्चा केली जाणार आहे, असे सांगून जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांच्या काही समस्या असल्यास लिखित स्वरुपात त्या सादर कराव्या, असे आवाहनही भोयर यांनी केले आहे.
विविध प्रलंबित प्रश्नांवरून शिक्षक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:31 PM