शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या शिक्षकांच्या हालचाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 8:39 PM

मालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते. शालेय पोषण आहार, हजेरी टपा नोंद, उपस्थिती भत्ता, विविध शिष्यवृत्ती अर्ज, शालार्थ, नवोदय परीक्षा, गणवेश, संच मान्यता, सरल, शाळा सोडण्याचा दाखला यासह एकूण २५ प्रकारची कामे आता शिक्षक वर्गावर आली आहेत. त्यामुळे एकूण अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी केला. अनेक वेळा आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागतो. वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आॅनलाईन प्रक्रिया किंवा अन्य अशैक्षणिक कामे पूर्ण करण्याची कोणतीही सुविधा शाळास्तरावर शासनाने उपलब्ध करून दिली नाही. त्यासाठी नेहमी तालुका ठिकाणी जावे लागते. यामध्ये वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. एका दिवसात काम झाले नाही तर दुसºया दिवशी पुन्हा तालुका ठिकाणी जावे लागते. मग विद्यार्थ्यांना शिकवावे कधी? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. बरेच वेळा अनेक निरोप ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून मिळतात. या निरोपानुसार, एखादी माहिती तातडीने त्या-त्या कार्यालयात जमा करा, अशा सूचना मिळतात. एखाद्यावेळी अध्यापन सुरू असताना ‘व्हाट्स अप’चा संदेश बघण्यात आला नाही तर वरिष्ठांकडून तंबीही दिली जाते. यामुळे सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी केला.यासाठी शिक्षक संघटना मिळून सर्वांनी  एकत्र येऊन लढ़ा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. अशैक्षणिक कामे काढून घ्यावी, आॅनलाईन किंवा संगणकीय कामासाठी तालुकास्तरावर जाण्याकरिता एका विशिष्ट कर्मचाºयाची नियुक्ती करावी, पत्र व्यवहारसाठी ‘व्हाट्स अप’ची सक्ती करू नये आदी मागण्या शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत.

सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अशैक्षणिक तसेच आॅनलाईन कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचे शिक्षक बांधव चिंतेच्या सावटाखाली राहतात. शासनाने आॅनलाइनची कामे त्रयस्त व्यक्तींकडून करुन घ्यावी. यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना