वाशिम, दि. २0- वारंवार मागणी करूनही प्रश्न प्रलंबितच राहत असल्याचे पाहून प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी आक्रमक होत शुक्रवारी शिक्षणाधिकार्यांशी चर्चा केली. प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी तुरणकर यांनी दिले. वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत विषय शिक्षकांचा प्रश्न गेल्या अनेक महिण्यापासून प्रलंबीत आहे. अनेक वेळा तारखा निश्चित केल्या; परंतू अद्यापही विषय शिक्षकांची निवड झाली नाही. चटोपाध्याय वेतनश्रेणीचे सव्र्हीस बुक पडताळणी अद्याप झाली नाही. ही पडताळणी का झाली नाही? याचा जाब विचारला. पडताळणी लवकरात लवकर करण्याची हमीही शिक्षणाधिकार्यांनी यावेळी दिली. मेडीकल बिलाचे पैसे संबंधिताना देणार असल्याचे सांगितले. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नत्या लवकरात लवकर करण्याची ग्वाही केली. शिक्षक कृती समितीच्या या शिष्टमंडळात विजय मनवर, रा. सु. इंगळे, पुरूषोत्तम तायडे, विलासराव गोटे, केशव अंजनकर, महेंद्र खडसे, संतोष आमले, संतोष खोडे, रामप्रसाद धनुडे, हेमंत तायडे, विनोद राजगुरू, शिवाजी पोटे, संपत पांडे, अनिसोद्दीन शेख, पांडुरंग काठोळे यासह बहुसंख्य पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
प्रलंबित प्रश्नावरून शिक्षक संघटना आक्रमक!
By admin | Published: January 21, 2017 2:21 AM