लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासकीय कर्मचाºयांकरीता शासनाने लागेू केलेल्या ‘राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेला’ जिल्ह्यात शिक्षकांचा प्रतिसाद वाढला असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातील हजारो शिक्षकांनी पत्र देऊन वर्गणी कपात करण्यास सहमती दर्शविली आहे. राज्य शासकीय कर्मचाºयांकरीता शासनाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या निर्णयानुसार ‘राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केली असून, १८ फेब्रुवारी २०१७ च्या निर्णयाद्वारे या योजनेला पुढे चालू ठेवण्यास मान्यता दिली, तसेच ११आॅगस्ट २०१७ च्या शासन निर्णयान्वये अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या देय मार्च महिन्यातील वेतनातून वार्षिक वर्गणी म्हणून कर्मचाºयांच्या वेतनातून ३६४ रुपयांची कपात करण्यात येते. तथापि, ही ऐच्छिक स्वरूपाची योजना असल्याने याबाबत शासकीय कर्मचाºयांत उदासीनता दिसत होती. यात शिक्षकांचाही समावेश होता. याबाबत जनजागृती करण्यात आल्यानंतर शिक्षकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्हाभरातील हजारो शिक्षकांनी या योजनेंतर्गत अर्ज सादर करून वर्गणी कपात करण्यास सहमती दर्शविली आहे. या योजनेंतर्गत संभाव्य अपघातासाठी शिक्षकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी वार्षिक वर्गणी करण्याच्या निकषात शासनाने गत महिन्यात काही बदलही केले आहेत.
कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विम्याला शिक्षकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 4:17 PM