वाशिम : प्राथमिक शिक्षण क्षेत्रात्र प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संभाव्य निवडणुकीकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे.साधारणत: सव्वा पाच वर्षांपूर्वी वाशिम जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली होती. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ १ जानेवारी रोजी संपुष्टात आला. दरम्यान कोरोनामुळे सहकारी पतसंस्थेच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एप्रिलनंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो किंवा कोरोनाचे संकट कायम राहिल्यास निवडणूक लांबणीवरही पडू शकते, असा अंदाज शिक्षक संघटनांमधून वर्तविला जात आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून शिक्षक संघटना कामाला लागल्या असून, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येते.वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ६० ते ७० कोटींच्या घरात असून, एकूण सभासद संख्या २५६० आहे. कर्जाचा नियमित भरणा करणाºया शिक्षक सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. जिल्ह्यातील २४०० च्या आसपास शिक्षक हे मतदार म्हणून पात्र ठरू शकतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही शिक्षक संघटनांमध्ये प्रतिष्ठेची म्हणून गणली जाते. पतसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी तर पतसंस्थेवर ताबा मिळविण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याने यावेळची निवडणूक अतितटीची होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोनाकाळातही शिक्षकांशी संबंधित विविध प्रश्न घेऊन विविध शिक्षक संघटनांची नेते मंडळी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठाण मांडून बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
पतसंस्थेच्या संभाव्य निवडणुकीकडे शिक्षकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 3:58 PM