लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातल अडोळी येथील शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘एल्गार’ पुकारून १४ ते २४ जानेवारी या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा निर्धार केला होता. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांचे प्रश्न १७ जानेवारीपर्यंत मार्गी लावण्याची ग्वाही शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांनी दिली. त्यामुळे शिक्षकांनी तुर्तास बैठा सत्याग्रह मागे घेतला.अडोळी येथील नागसेन विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना मागील ४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांना किमान अतिरिक्त ठरवून त्यांचे इतरत्र समायोजन करावे, थकित वेतन तत्काळ मिळावे, प्रलंबित वैद्यकिय व अन्य देयके मंजुर करावी,भविष्य निर्वाह निधी हिशेब चिठ्ठ्या मिळाव्यात, आदी मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी १४ जानेवारीला बैठा सत्याग्रहास सुरूवात केली होती. त्याची दखल घेवून माजी आ.वसंतराव खोटरे, प्रांताध्यक्ष विकास सावरकर यांनी दुरध्वनीवरुन शिक्षणाधिकाºयांशी चर्चा केली. पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांत उपाध्यक्ष विनायक उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष मंगेश धानोरकर यांनीही सत्याग्रहस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. दरम्यान, १७ जानेवारीपर्यंत संबंधित शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन करणे व थकित तथा नियमित वेतन करण्याचा प्रस्ताव संचालकांकडे पाठवून इतर प्रश्नही सोडविण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी शिक्षणाधिकाºयांनी दिली. त्यामुळे शिक्षकांनी बैठा सत्याग्रह तुर्तास स्थगित केला; परंतु प्रश्न निकाली न निघाल्यास पुन्हा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षकांचे प्रश्न लागणार मार्गी; शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही, बैठा सत्याग्रस्त स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 3:28 PM