लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जि. प . शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत अडचणी कायम आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाला बदली प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बदल्या करण्यास ७ जूनपर्यंत शासनाने २७ मे रोजी मुदतवाढ दिली होती ; पंरतु कोठे समुपदेशन केंद्राचा अभाव, तर कोठे मॅपिंग होऊनही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसणे आदि कारणांमुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे चित्र पश्चित वºहाडात पाहायला मिळत आहे. या संदर्भात ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना बदली प्रक्रियेला वेग देण्याच्या सुचना ७ जूनच्या पत्राद्वारे केल्या आहेत.अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असून, जिल्ह्यातील ३४७१ पैकी २९१२ शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ५०० शिक्षकांचे मॅपिंग तातडीने करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी, ७ जून पर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. बुलडाणा जिल्ह्यात ६३५७ शिक्षकांचे मॅपिंग झाले असून, या ठिकाणी शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. त्याशिवाय वाशिम जिल्ह्यात ३१५७ शिक्षकांपैकी ३०५० शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, जिल्ह्यातील एकाही तालुक्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले नसून, व्हॉटसअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना समुपदेशन करण्यात येत आहे. यात कोणता शिक्षक बदलीसाठी पात्र आहे. अर्ज करण्याची पद्धती तसेच, इतर माहिती देण्यात येत आहे; परंतु या प्रकारामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात मुख्यकार्यकारी अधिकाºयांच्या लॉगिनमधील बदलीच्या अनुषंगाने संवर्ग १ ते संवर्ग ४ मधील सर्व शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत चुका होऊ नयेत म्हणून योग्यरित्या समुपदेशन करण्यात येत आहे. येत्या दोन चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम