शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:50 AM

वाशिम : मागील २० महिन्यांपासून शासनाकडे शिक्षण, विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने मागण्यांची कोणतीही दखल ...

वाशिम : मागील २० महिन्यांपासून शासनाकडे शिक्षण, विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ जुलै रोजी राज्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन करीत मागण्यांबाबतचे निवेदन तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्य स्तरांवर देण्यात आले. वाशिम जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र आंदोलन टाळले असून, स्थानिक शाळेमध्ये काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मागण्या निकाली काढण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतु याकडे कुणीही लक्ष दिले नाही. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला. ३२ प्रलंबित मागण्या शासनाने तत्काळ मान्य कराव्यात, यासाठी अमरावती विभाग अध्यक्ष राजकुमार बोनकिले, अमोल काटेकर, मनोज डाखोरे, किशोर लोहकरे, गजानन कुबडे, अशोक बोंद्रे, राजेश संगवई यांनी शिक्षणाधिकारी वाशिम यांना निवेदन दिले.

०००

या आहेत मागण्या

जुनी पेंशन योजना लागू करून भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, १०, २०, ३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करणे, शिक्षकेत्तरांची पदे भरतीबाबतचा बंदी निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे, डी.सी.पी.एस.धारकांना पावत्या देण्यात याव्यात, संस्थांतर्गत वाद असणारा पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देणे, आभासी पद्धतीने सुरू असलेल्या शिक्षण प्रणालीमध्ये एकसूत्रता यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आदी मागण्या करण्यात आल्या.