शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

समुपदेशन पद्धतीने शिक्षकांची पदस्थापना !

By admin | Published: July 17, 2017 6:43 PM

वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली निघाले. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात एकूण २१३ शिक्षक बदलीस पात्र ठरले. २१३ पैकी १४७ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर पदस्थापना देण्यासाठी सोमवारी समुपदेशन पध्दती राबविली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर गोळे, शिक्षणाधिकारी अबादास मानकर यांच्या उपस्थितीत १४७ शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. समुपदेशन पध्दतीतून प्राधान्यक्रमानुसार नियुक्ती मिळाल्याने गैरप्रकारांना आळा बसला, अशा प्रतिक्रिया उमटल्या.