कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, प्राचार्य अरुण सरनाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत रामगिरीजी महाराज सचिव भिकाजी नागरे, संचालक डॉ. श्रीराम गरकळ, प्राचार्या वानखेडे, व जोशी यांच्या हस्ते माता सरस्वती आप्पासाहेब सरनाईक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय प्रल्हाद आप्पाजी काष्टे संचालक, पार्वतीबाई चोपडे संचालिका, माजी आमदार गणपतराव देशमुख, शेगाव संस्थानचे व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील, कोविड-१९ मुळे मयत झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आदरांजली पर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भर जहागीर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस. बी. धांडे यांनी, तर आभार प्रदर्शन व जायभाये यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भर जहागीर येथील सेवानिवृत्त कर्मचारी डी. पी. जोशी तसेच नवनियुक्त संचालक एम. आर. काष्टे, गंगासागर पंढरीनाथ चोपडे यांचा सत्कार शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही पेन्शन मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:47 AM