लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मार्च एप्रील हा शाळेतील परीक्षांचा काळ, याच काळात विद्यार्थी सर्वात जास्त व्यस्त आणि आनंदी असतो कारण आगामी उन्हाळी सुट्ट्यांची चाहूल त्यांना याच काळात लागते. बहुतांश इंंग्रजी माध्यमांच्या शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष हे एप्रिल महिन्यातच सुरू होत असते , यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे १५ मार्चपासूनच शाळांना अघोषित सुट्ट्या जाहीर झाल्यात. याच पार्श्वभूमीवर हॅपी फेसेस द कंसेप्ट स्कूल वाशीमच्यावतीने लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व अध्ययन-अध्यापनातील खंड भरून काढण्यासाठी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना हॅपी फेसेसचे संचालक दिलीप हेडा हे राबवीत आहेत. या माध्यमातून शाळेने डेल्टास्टेप नावाचे शैक्षणिक सामुग्री असलेल्या अध्ययन सॉफ्टवेअरची (आज्ञावली)निर्मिती केली असून या आज्ञावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वत:ची नोंदणी करून आपल्या वर्गाशी निगडित विविध विषयांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घेता येत आहे .सोबतच विविध चाचण्या, प्रश्नसंचाचा त्यात समावेश असून विद्यार्थी घरून देखिल स्वंय अध्ययनाचा आनंद घेताहेत. यादरम्यान, दररोज ठरलेल्या तासिकांप्रमाणे संबंधित विषयांचे शिक्षक झुम मीटिंग या आॅनलाईन व्हिडिओ कॉंन्फरंसींग प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांचे मार्गदर्शन ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरू आहे.दरम्यान शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना येणा?्या अडचणीचे निराकरण करून त्या वर्गाच्या व्हॉटसअप गृप द्वारे विद्यार्थ्यांशी अप्रत्यक्ष संवाद साधून समस्यांचे निराकरण केले जात आहे.
विविध कौशल्य विकसीत करण्याचे आवाहनहॅपी फेसेस द कंसेप्ट स्कूल वाशीमच्यावतीने लॉकडाउनच्या सुरु केलेल्या या आगळ्या वेगवेगळ्या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांनी आपले विविध कौशल्य विकसीत करुन विवीध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन संचालक दिलीप हेडा यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना केले आहे. लॉकडाउनमुळे मिळालेल्या सुट्ट्या ह्या उन्हाळी किंवा ईतर सुट्ट्या नसून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यापासून आपली सुरक्षा व्हावी म्हणून मिळालेला तो एक कालावधी आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ आपल्या व्यक्तिगत कला गुणांचा विकास व ज्ञानार्जनासाठी घालविण्याकरिता हा उपक्रम असल्याचे दिलीप हेडा यांनी सांगितले.