लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्यावतीने विविध स्तरावर मोहिम राबवून स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात मात्र घाण कचºयाच्या विळख्यात शिक्षण आणि स्वच्छतेचे धडे देण्यात येत असल्याचे विचित्र वास्तव पाहायला मिळत आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेत शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे, हे येथे उल्लेखनीय.मंगरुळपीर येथील अकोला चौक परिसरात जिल्हा परिषदेचे उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयाच्या समोरच तालुका क्रीडा संकुल काही वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याने विद्यालयाचा परिसर कमी झाला. आता या शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अकोला चौकातून अकोलाकडे जाणाºया मार्गावर प्रवेशद्वार उभारण्यात आले; परंतु या प्रवेशद्वाराजवळ परिसरातील लोकांनी घाण, कचरा टाकणे सुरू केले, तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपेही वाढली. शाळेच्या मागील बाजूत शौचालयाचा सेप्टिक टँकही उघडाच असून, त्या लगतच मोठे गटार साचले आहे. येथेही मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. आता या परिस्थितीतच या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे आणि शासनाच्या स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्याचे धडे देण्यात येत आहेत. शाळेच्या कुंपणाची पार मोडतोड झाली असून, परिसरात अतिक्रमण झाले आहे. या सर्व प्रकाराकडे शिक्षण विभागाचे मात्र पार दुर्लक्ष आहे. मागील दीड वर्षांपूर्वी या शाळेला कूंपण भिंत उभारण्यासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती तत्कालीन मुख्याध्यापकांनी दिली होती; परंतु अद्यापही येथे कुंपणभिंत उभारण्यात आली नाही. त्यामुळे निधी प्राप्त झाला की नाही, किंवा प्राप्त झाला असेल, तर कूंपणभिंत का उभारली गेली नाही, हे प्रश्न अनाकलनीय आहेत.
घाणीच्या विळख्यात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 8:05 PM
वाशिम: शासनाच्यावतीने विविध स्तरावर मोहिम राबवून स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात मात्र घाण कचºयाच्या विळख्यात शिक्षण आणि स्वच्छतेचे धडे देण्यात येत असल्याचे विचित्र वास्तव पाहायला मिळत आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेत शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे, हे येथे उल्लेखनीय.
ठळक मुद्देशिक्षण विभाग सुस्त मंगरुळपीरच्या जि.प. उच्च माध्य. विद्यालयातील वास्तव