ही स्थिती तालुक्यात नव्हे तर सगळीकडे असू शकते, कारण ज्या वेबसाईट अंतर्गत हा विमा काढला जातो ती साइटच सध्या स्थितीत खूपच हळू काम करीत आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व अन्य रोगांमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मदत म्हणून सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदतसुद्धा झाली आहे. खरीप हंगाम सुरू होताच शेतकरी वर्ग आपल्या शेतात पेरलेल्या पिकांचे विमा संरक्षण करण्याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत विमा काढतात. सन २०२१-२२ या चालू हंगामाकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत पिकांचे विमा काढण्याकरिता शेतकरी ऑनलाइन केंद्रांना भेट देत आहे, परंतु त्या ठिकाणी सर्व्हर काम करीत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. दिवसभरात मोठ्या मुश्किलीने हे एक ते दोन फॉर्म यशस्वीरित्या फिलअप होतात. वरूनच प्रॉब्लेम असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले असतानासुद्धा ते फॉर्म फिलअप करता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तसेच १५ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसल्याने ही तारीख वाढविण्याची गरज आहे.
पीकविमा भरण्यास शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:28 AM