सध्याच्या परिस्थितीत शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी व जबरी चोरी (दरोडा) मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक हत्या व जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत चाकातीर्थ येथे एका दाम्पत्याची हत्या, अशा मोठ्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांची माहिती पोलिसांना देण्यासाठी सुद्धा दूरध्वनी बंद असल्याने अडचण निर्माण होते. पोलीस स्टेशनचे दूरध्वनी सुरू होण्याची शक्यता कमी असल्यास अंमलदार किंवा स्टेशन डायरीच्या ठिकाणी एक स्वतंत्र मोबाईल ठेवण्यात यावा. तो मोबाईल क्रमांक सार्वजनिक करण्यात यावा. जेणेकरून कुठलीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांना पोलीस स्टेशनची तात्काळ संपर्क करता येईल. सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांजवळ मोबाईल असले तरी त्यांचे नंबर सामान्य नागरिकांकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे पोलीस स्टेशनचे दूरध्वनी सुरू करणे अथवा ठाणे अंमलदार स्टेशन डायरीवर स्वतंत्र मोबाईल नंबर उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.
.... बंद दूरध्वनीबाबत वेळोवेळी शिरपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
कृष्णा नागरे, कर्मचारी पोलीस स्टेशन शिरपूर जैन