लोकमत न्युज नेटवर्क अनसिंग (वाशिम) : अनसिंग येथील मोघन तलावातून अवैध पाणी उपसा करणारे १० मोटार पंप जप्त करण्याची कारवाई अनसिंग ग्रामपंचायतीच्यावतीने २७ जानेवारी रोजी केली.मोघन तलावातून होत असलेला उपसा बंद करून मोटारपंप काढण्याची सुचना अनसिंग ग्रामपंचायतने संबंधितांना २३ डिसेंबर २०१९ रोजी नोटीसद्वारे केली होती. यासाठी संबंधितांना ७ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. तथापि, मुदत उलटून गेल्यानंतरही या तलावातून पाणी उपसा करणे सुरूच होते. यामुळे गावातील भुजल पातळी खालावून पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती असल्याने अखेर अनसिंग ग्रामपंचायतने २७ जानेवारी रोजी या तलावावर बसविण्यात आलेले १० मोटारपंप जप्त केले आहेत. या कारवाईसाठी पोलीस प्रशासनासह व महावितरणच्या अधिकाºयांचे सहकार्य ग्रामपंचायतच्यावतीने घेण्यात आले. या कारवाईच्यावेळी ग्रा.प संरपचांसह ग्रा.प. सदस्य गजानन वल्लेकर,विठ्ठल सातव, सचिव मधुकर बोडखे व ग्रा.प कर्मचारी उपस्थित होते.
अवैध पाणी उपसा करणारे १० मोटार पंप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 4:38 PM