लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सन २०१७-१८ च्या खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास शासन निर्णयाप्रमाणे मान्यता मिळालेली आहे. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळाता यावी व अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन या खरीप हंगामापासुन गावपातळीवर पुरक नोंदणी सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.याकरीता ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सी.एस सी) ही सुविधा शेतकऱ्यांना अर्ज भरण्याकरीता उपलब्ध करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉब कार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा योजना ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून ३१ जुलै २०१७ पर्यंत लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत
By admin | Published: July 12, 2017 1:34 AM