वाशिम : 'रन फॉर युनिटी' अर्थात एकता दौडची कसोटी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणारी एकता दौड यशस्वी करण्यासाठी जिल्हा यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली. शाळा-महाविद्यालयांना सुट्टय़ा असल्यामुळे उद्याच्या राष्ट्रीय एकता दौडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती शासकीय-निमशासकीय यंत्रणेने साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत. वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्याबरोबरच एकता दौड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा व यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी सर्व अधिकारी-कर्मचार्यांची बैठक घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले होते. एकता दौड बरोबरच 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छता मोहिमेचेही यावेळी आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या एकतेबरोबरच स्वच्छताही किती महत्त्वाची आहे, हे यावेळी पटवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
‘एकता दौड’च्या यशस्वितेची कसोटी
By admin | Published: October 31, 2014 1:34 AM