वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा आरोपीला भोवला आहे. मालेगाव सह दिवाणी न्यायाधिश (कनिष्ठ स्तर) पी. यू. कुळकर्णी यांनी १ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी आरोपी संतोष जितासिंग राठोड याला दोन वर्षाच्या साध्या कारावासह २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही येथील आरोपी संतोष जितासिंग राठोड याने तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना २०१४ मध्ये घडली होती. या प्रकरणी आरोपीवर मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यासह सरकारी अभियोक्ता म्हणून एपीपी भास्कर इंगळे यांनी भूमिका पार पडली. या प्रकरणाची सुनावणी १ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. तपास अधिकारी पी.एच मानलवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल विष्णू डिंडरकर यांनी कोर्ट पैरवी केली. या प्रकरणी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पी. यू. कुळकर्णी यांनी निकाल देताना आरोपी संतोष जितासिंग राठोड यास दोन वर्षाच्या साध्या कैदेसह २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.