शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

कोकलगावात चोरी; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 6:14 PM

कोकलगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया कोकलगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध ८ जुलै रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर सिताराम काळबांडे (कोकलगाव) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ते त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसमवेत घरातील एका खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी शिताफिने दुसºया खोलीच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्या खोलीतून साडेतीन तोळे सोने (किंमत १ लाख २० हजार) तसेच २ लाख १९ हजार ५०० रुपये रोख आणि घरासमोर उभी करून असलेली मोटार सायकल (किंमत २५ हजार रुपये) यासह अन्य असा एकूण ३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंविचे कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी