लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : स्थानिक बस आगारात कर्मचार्यांनी १७ ऑक्टोंबर रेाजी पुकारलेल्या बंदबाबत व त्यांच्या समस्यांबाबत कर्मचार्यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्यात. यावेळी त्यांनी शासनस्तरावर आपल्या मागण्या पोहचविण्याचे आश्वासन ठाकुर यांनी दिल्यात.१७ ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचारी वृंद रिसोड तर्फे त्यांच्या वे तन वाढीबद्दल तसेच इतर काही मागण्या प्रलंबित असल्यामुळे कर्मचार्यांनी बंद पुकारला . त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर सर्व जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रिसोड आगारतर्फे अध्यक्ष , सचिव व सर्व कर्मचार्या तर्फे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांना निवेदन देवून आपल्या समस्या मांडल्यात. लखनसिंह ठाकूर यांनी समस्या जाणून घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, भारती जनता पाटीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे तथा भाजपा जिल्हाअध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्यापयर्ंत समस्या पोहचवून त्या लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासीत केले . निवेदन देतांना डेपो सचिव संजय चाटे, डेपो कार्याध्यक्ष पवन नाना शिंदे , मिनाक्षी निंबोळे, कोडापे , शेख, व्हि.डी.मोरे कैलस देशमुख, नारायण शेळके, बी.एच.सानप , एस.पी.पठान यांच्यासह रिसोड आगारातील समस्त कर्मचारी हजर होते. निवेदन स्वीकारतेवेळी लखनसिंह ठाकुर यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष सुनिल पाटील, प्रदेश सदस्य अशोकराव सानप, क्रिडा जिल्हाअध्यक्ष नंदकिशोर मगर , युवामोर्चा जिल्हाउपाध्यक्ष भारत नागरे, गजानन कोकाटे, प्रसिद्धी प्रमुख किशोर गोमासेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते
एसटी कर्मचार्यांनी मांडल्या त्यांच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:45 AM
स्थानिक बस आगारात कर्मचार्यांनी १७ ऑक्टोंबर रेाजी पुकारलेल्या बंदबाबत व त्यांच्या समस्यांबाबत कर्मचार्यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्यात. यावेळी त्यांनी शासनस्तरावर आपल्या मागण्या पोहचविण्याचे आश्वासन ठाकुर यांनी दिल्यात.
ठळक मुद्देसमस्या शासनापर्यंत पोहचविण्याचे ठाकूर यांचे आश्वासन कर्मचार्यांनी दिले निवेदन