जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. रुग्णांचा आकडा हा एक अंकी असल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही तर तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
९ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नवीन रुग्ण आढळून आला नाही तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात ९ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. एकही रुग्ण दवाखान्यात भरती नाही.
0000000000000
बाजारपेठेतील गर्दी टाळणे आवश्यक
जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असल्याने आणि अनलॉकचा टप्पा असल्याने वाशिमसह रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा व मालेगाव या प्रमुख शहरांतील बाजारपेठेत नागरिकांची चिक्कार गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी यापुढेही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक ठरत आहे.