लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील शुक्रवार पेठेतील राजगुरू गल्लीस्थित विठ्ठल मंदिर परिसरात दोन गटांत वाद झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. एका गटाकडून दुसर्या गटावर दगडफेक करण्यात आली असून, यात तीन जण जखमी झाले आहेत. याशिवाय काही वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली. राजगुरू नगरमध्ये रात्री ११ वाजताच्या दरम्यान एका गटाने दुसर्या गटाच्या घरावर दगडफेक केली. ही दगडफेक एवढी मोठी होती, की सर्वत्र दगडांचा खच पडला होता. हल्लेखोरांनी परिसरातील पानटपर्यांची तोडफोड केली. याशिवाय एक चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्यांचीदेखील मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या दगडफेकीत दोन पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरले असून, परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असली, तरी नियंत्रणात आहे. पोलीस अधीक्षकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
वाशिम शहरात दोन गटांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:35 AM
वाशिम : शहरातील शुक्रवार पेठेतील राजगुरू गल्लीस्थित विठ्ठल मंदिर परिसरात दोन गटांत वाद झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. एका गटाकडून दुसर्या गटावर दगडफेक करण्यात आली असून, यात तीन जण जखमी झाले आहेत. याशिवाय काही वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली.
ठळक मुद्देशहरात तणाव पोलिसांचा बंदोबस्ततीन जखमी