राज्य परिवहन महामंडळाकडून गतवर्षी सरळसेवा भरती प्रक्रिये अंतर्गत चालक, वाहकांची पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या अकोला परिवहन विभागासाठी विविध प्रवर्गातील जागा भरल्या जाणार होत्या. त्यापैकी ३० टक्के महिला आरक्षणानुसार महिला चालक वजा वाहकांची पदे भरली जाणार होती. यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कोरोना संसर्ग वाढू लागल्याने शासनाच्या निर्देशानुसार या पदाच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया थांबविण्यात आली. आता हे प्रशिक्षण घेण्यास मूभा देण्यात आली असून, या प्रशिक्षणासाठी अकोला विभागातील दोन मुलींची निवड झाली आहे. त्यांचे प्रशिक्षण येत्या सोमवारपासून सुरू होणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.
------------
वाशिम जिल्ह्यातून प्रतिसादच नाही
तथापि, यासाठी वाशिम जिल्ह्यातून एकाही युवतीने चालक पदासाठी अर्ज केला नसल्याचे अकोला विभागीय नियंत्रक कार्यातून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकही युवती एसटीचालक पदावर नियुक्त होण्याची शक्यता सद्य:स्थितीत मावळली आहे. प्रत्यक्षात अकोला विभागातून केवळ दोनच मुलींची चालक पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यांचे प्रशिक्षणही आता सुरू होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी दिली.
----------------
कोट: महामंडळाकडून राबविण्यात आलेल्या महिला चालक भरती प्रक्रियेंतर्गत चालक वजा वाहक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विभागातून दोनच मुलींची निवड झाली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील महिला उमेदवाराचा समावेश नाही. निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पत्र पाठविले जाणार आहे.
-योगेश ठाकरे,
विभागीय वाहतूक अधीक्षक
----------------
कोट: राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात आलेल्या महिला चालक भरतीप्रक्रियेंतर्गत वाशिम आगारात एकाही उमेदवाराची नियुक्ती अद्याप झाली नाही. जिल्ह्यातील अर्जांची माहिती विभागीय स्तरावर उपलब्ध असते. त्यामुळुळे या भरतीसाठी राबविण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेबाबतही कल्पना आपणाला नसल्याने निश्चित सांगता येणार नाही.
-विनोद इलामे
आगार व्यवस्थापक, वाशिम
-----------------
कोट: राज्य परिवहन महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या भरतीप्रक्रियेंतर्गत सादर अर्जांसह उमेदवारांच्या नियुक्तीची सर्व माहिती विभागीय स्तरावरच असते. त्यामुळे आपण याबाबत काही सांगू शकणार नाही. त्यात गतवर्षी राबविण्यात आलेल्या महिला चालकांच्या भरतीप्रक्रियेंतर्गत कारंजा आगारात एकाही महिला चालकाची नियुक्ती झाली नाही.
-मुकुंद न्हावकर,
आगार प्रमुख, वाशिम
----------------
जिल्ह्यातील आगार ०४
जिल्ह्यातील ड्रायव्हर ४१३
जिल्ह्यातील कंडक्टर ३८७
महिला कंडक्टर ३८
----