वाशिम: रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर दीर्घ उपचार गरजेचे असतात. अशात त्यांना पशूवैद्यकीय दवाखान्यांतही ठेवावे लागते; परंतु यासाठी आवश्यक निवाऱ्याचा जिल्ह्यात अभाव असल्याने उपचार करूनही वन्यप्राणी दगावत आहेत. ही गंभीर लक्षात घेऊन जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या मंगरुळपीर येथे जखमी वन्यप्राण्यांसाठी निवाऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात वन्यप्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, या वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी पुरेशी यंत्रणा वाशिम जिल्ह्यात नाही. वाशिम जिल्हा जंगली भागाने वेढला आहे. त्यातच या जिल्ह्यात काटेपूर्णा आणि सोहळ अशी दोन अभयारण्ये आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा येथे निसर्ग पर्यटन केंद्रही प्रस्तावित आहे. जिल्ह्यात निलगाय, काळविट, हरण आदि वन्यप्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे. यातील काही वन्यप्राणी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने किंवा इतर कारणांनी गंभीर जखमी होतात. या प्राण्यांना उपचारासाठी नेआण करण्यासाठी अॅम्बुलन्स नाहीच शिवाय स्वयंसेवी, आपत्कालीन संस्था किंवा वन्यजीव प्रेमींनी या वन्यप्राण्यांना उपचारास आणल्यानंतर त्यांना पशुवैद्यकीय केंद्रांत ठेवण्यासाठी निवाराही नाही. गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते, तसेच त्याची देखरेखही आवश्यक असते. तथापि, निवारा नसल्याने त्यांना कोठे ठेवावे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे उपचार करूनही वन्यप्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत. वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुका केंद्रस्थानी असून, या ठिकाणी पशुवैद्यकीय केंद्रही आहे. त्यामुळे या ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांच्या निवाºयाची व्यवस्था येथे के ल्यास शेकडो वन्यप्राण्यांना उपचाराखाली ठेवून त्यांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीचे प्रमुख तथा मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. मंगरुळपीर येथे असलेले पशुवैद्यकीय केंद्र हे जिल्हा परिषद वाशिमच्या अधिनस्थ असल्याने या ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांसाठी निवारा उभारावा, अशी मागणी त्यांनी त्या निवेदनातून केली आहे.
वाशिम जिल्ह्यात जखमी वन्यप्राण्यांसाठी निवाऱ्यांची व्यवस्थाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:43 PM
वाशिम: रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर दीर्घ उपचार गरजेचे असतात. अशात त्यांना पशूवैद्यकीय दवाखान्यांतही ठेवावे लागते; परंतु यासाठी आवश्यक निवाऱ्याचा जिल्ह्यात अभाव असल्याने उपचार करूनही वन्यप्राणी दगावत आहेत.
ठळक मुद्देवन्यप्राणी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने किंवा इतर कारणांनी गंभीर जखमी होतात. गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते, तसेच त्याची देखरेखही आवश्यक असते. निवारा नसल्याने त्यांना कोठे ठेवावे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे उपचार करूनही वन्यप्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत.