शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

२० हजार लोकसंख्येच्या शिरपूरात ‘क्वारंटीन’ची सोय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:04 PM

‘होम क्वारंटीन’ केलेले अनेकजण गावात मुक्त संचार करित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्याने सर्वत्र हाहाकार माजला असताना मालेगाव तालुक्यातील  सर्वाधिक २० हजार लोकसंख्येच्या शिरपूरात मात्र परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून येणाºया लोकांना १४ दिवस जिल्हा परिषद शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी ‘क्वारंटीन’ करण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. ‘होम क्वारंटीन’ केलेले अनेकजण गावात मुक्त संचार करित आहेत. या गंभीर प्रकारामुळे गावकरी दहशतीत वावरत आहेत.पुणे, मुंबई, औरंगाबाद यासारख्या महानगरांसह परराज्यांमधून गावी परतणारे कामगार, मजूरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. संबंधितांपैकी कुणाला कोरोना विषाणूची लागण झालेली असल्यास संपूर्ण गाव धोक्यात सापडू शकते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांची आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्हा परिषद शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी किमान १४ दिवसांसाठी ‘क्वारंटीन’ करण्याची सुविधा आतापर्यंत निर्माण करायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र यापूर्वी परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून शेकडोजण शिरपूरात दाखल होऊनही ग्रामपंचायतीने विशेष दखल घेतली नाही. त्यातील काही लोकांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्के मारून त्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला; मात्र त्यांच्यापैकी अनेकांचा गावात मुक्त संचार सुरू असताना त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. गावातील आरोग्य सेवक क्षितीज लांडगे, अमर झळके, नामदेव पुंड, ग्रामपंचायत कर्मचारी महाविर बेलोकार, तलाठी एन.व्ही. अंबुलकर, जे.एन. साठे या काही लोकांव्यतिरिक्त कुणीही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी किंवा शिरपूरात दाखल होणाºया मजूरांची आरोग्य तपासणी करून त्यांना ‘क्वारंटीन’ करण्यासाठी कार्य करताना दिसून येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मुंबईहून शिरपूरात दाखल झाले ६० जण; आरोग्य तपासणीसाठी गर्दी!सोमवार, १८ मे रोजी मुंबई येथून शिरपूरात जवळपास ६० मजूर दाखल झाले. त्यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आरोग्य तपासणीसाठी मोठी गर्दी केली. यादरम्यान अनेकांना बराचवेळ ताटकळत बसावे लागले. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य तपासणीची व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याShirpur Jainशिरपूर जैन