लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही ‘रॅबीज लॅस’ उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे श्वानदंश झालेल्या रुग्णांची गत काही दिवसांत प्रचंड गैरसोय झाली.श्वानदंशानंतर आरोग्य विभागाच्यावतीने नि:शुल्क रेबीज लसीकरण केले जाते. शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत वरिष्ठ स्तरावरून ‘रॅबीज लसी’चा पुरवठा केला जातो. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास ३५ ते ४० गावे येतात. श्वानदंश झालेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची सुविधा आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. परंतू, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्यस्थितीत रॅबीज लस उपलब्ध नसल्याने मोठा पेच निर्माण झाला. काही रूग्णांना खासगी दवाखान्यांत उपचार घ्यावे लागले. रॅबीज लस लवकरात लवकर उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ पाच रॅबीज लसी उपलब्ध आहेत. सध्यस्थितीत शिरपूर आरोग्य केंद्रात रॅबीज लस उपलब्ध नाही. जिल्हा ठिकाणी उपलब्ध झाली आहे. लवकरच शिरपूर आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार आहे.- डॉ. संतोष बोरसे,तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव
शिरपूर आरोग्य केंद्रात ‘रॅबीज लस’च नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 4:23 PM