वाशिम : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासाचे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. सिंचन आरोग्य, शेतकरी, आत्महत्या, उद्योग व रेल्वे आदींसह अनेक मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा झाली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील अनेक मुद्यांचा समावेश होता. सरकार जिल्ह्यातील विविध मुद्यांवर गंभीर असून, लवकरच येथील विकासाची प्रक्रिया गतिमान होईल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. स्थानिक पाटणी कॉम्प्लेक्समधील कार्यालयात २८ डिसेंबरला पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुढे बोलताना पाटणी म्हणाले की, विदर्भाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत विरोधी पक्षाने आणलेल्या प्रस्तावावर मत मांडताना मागील ५0 ते ५५ वर्षांपासून शासनाने नागपूर कराची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नांवर वारंवार चर्चा करण्याची परिस्थिती निर्माण झाली, असे आपण भाषणात नमूद केले. घटनेच्या ३७१ (२) या कलमाचा समावेश १९५६ मध्ये करण्यात येऊन राष्ट्रपती महोदयांनी राज्यपालांना राज्याचा समतोल विकास करण्याची जबाबदारी दिली होती. सन १९९४ मध्ये राष्ट्रपतींनी राज्यपालांना सदर कलमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने सन २00१ मध्ये आदेश काढले. सन २00१ ते २0१४ पर्यंतचा अभ्यास केला असता राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतरही सन २0१ ते २0१४ पर्यंतचा विदर्भाचा अनुशेष दुप्पट झाला असून, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे पाटणी यांनी सांगितले.
अधिवेशनात विदर्भाच्या विकासाचे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली
By admin | Published: December 29, 2014 12:37 AM