- संतोष वानखडेवाशिम : यंदा शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे अत्यावश्यक असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ‘स्टुडंट पोर्टल’वर आधार विषयक नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यता करताना विचारात घेतली जाणार आहे. अद्याप आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत.राज्यातील प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया, ‘एनआयसी’मार्फत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होत असते. या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण विभागाने २०१९ -२० मध्ये ‘स्टुडंट पोर्टल’वर विद्यार्थी विषयक माहितीची नोंद करताना आधार क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तथापि, गतवर्षी अनेक शाळांनी आधार क्रमांक अद्ययावत केले नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले. चालू शैक्षणिक सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड अद्ययावत करणे आणि आधारकार्ड नसणाºया विद्यार्थ्यांसाठी आधारकार्डची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे वर्ग बंद आहेत. त्यामुळे तुर्तास तरी आधार क्रमांक अद्ययावत करणे किंवा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची कार्यवाही बंद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधारविषयक माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी स्तरावर दोन आधार मशिन पुरविण्यात येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आधार नोंदणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी पंचायत समिती स्तरावर दोन आधार मशिन मिळणार आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आधार नोंदणीविषयक सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळणार आहेत.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम
विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी पंचायत समिती स्तरावर मिळणार प्रत्येकी दोन मशिन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:56 PM