माेबाइल फारच महागडा व त्याचे बिल व इतर माहिती असणारे काहीच जण माेबाइल चाेरीची तक्रार करीत असल्याचे वास्तव आहे. पाेलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर माेबाइल गहाळ झाल्याची तक्रार नाेंदवली जाते. नागरिकांनी तक्रार करणे आवश्यक असल्याने पाेलीस म्हणतात त्याप्रमाणे तक्रार देऊन तिची सत्यप्रत अनेक जण आपल्याजवळ ठेवत असल्याचे वाशिम शहरात चित्र आहे.
-------
चोरी नव्हे, गहाळ म्हणा
माेबाइल चाेरीची तक्रार पाेलिसांत देण्यास गेल्यानंतर माेबाइल गहाळ झाल्याची तक्रार लिहून घेतली जाते.
एखाद्या नागरिकाने गहाळ नव्हे चाेरी झाली म्हटल्यास पाेलिसांकडून आपण चाेरास बघितले का, चाेरी नव्हे ताे गहाळ झाला, असे ते म्हणतात.
नागरिकांच्या माेबाइलचा गैरवापर हाेऊ नये, त्यांच्या माेबाइलवरून काेणाला काॅल जाऊ नये याकरिता पाेलीस तक्रार आवश्यक असल्याने काेणी काहीही बाेलत नाही.
----
या भागांमध्ये मोबाइल सांभाळा...
वाशिम शहरातील सर्वांत गजबजलेल्या पाटणी चाैकात माेबाइल चाेरीच्या घटना सर्वाधिक आहेत.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात माेबाइल चाेरीच्या घटना घडत असल्याने येथे माेबाइल सांभाळून ठेवावा लागताे.
वाशिम बसस्थानकामध्येसुद्धा माेबाइल चाेरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. गत दाेन दिवसांआधी बसमध्ये चढताना एकाचा माेबाइल चाेरीस गेला.