लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी तिसºयांदा मुदतवाढ दिली असून आता २९ फेब्रूवारीपर्यंत अंतिम मुदत मिळाली आहे.अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवगार्साठी राबविण्यात येणाºया मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर आॅनलाईन झालेल्या योजनांकरिता आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपापल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याविषयी सूचना द्याव्या, असे निर्देश समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिले. तसेच महाडीबीटी पोर्टलवर विहित मुदतीत संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर आॅनलाईन झालेल्या योजनांकरिता आॅनलाईन प्राप्त झालेले सर्व अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करावी आणि त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावर दिलेल्या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, वाशिम यांना आॅनलाईन पाठवावेत, असे आवाहन माया केदार यांनी केले.
शिष्यवृत्तीचे अर्ज ‘महाडिबीटी’वर सादर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 7:00 PM