वाशिम : शेतजमिनीतील माती सुपीक असेल तरच त्यातून दर्जेदार उत्पन्न घेणे शक्य आहे. यासाठीच शेतांमधील मातीचे नियमित परिक्षण करणे गरजेचे आहे. ते करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व त्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका अर्थात ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देणे कृषी विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, याबाबत संबंधित यंत्रणेने उदासिनता बाळगली असून हजारो शेतकरी अद्याप या सुविधेपासून वंचित आहेत. वाशिम जिल्ह्यात तर कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षण प्रयोगशाळा अद्याप उभारल्या गेलेली नाही.बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. शेतांमधून भरघोस पीक घेण्याच्या उद्देशाने काही प्रयोगशील शेतकरी माती परीक्षण करून जमिनीच्या आरोग्यानुसार पीक पेरणी करण्यास पसंती देतात. मात्र, अभ्यासांती शेती करणारे असे शेतकरी मोजकेच असून माती परीक्षणासंबंधी बहुतांश शेतकरी आजही अनभिज्ञ आहेत. परिणामी, जमिनीच्या सुपिकतेसंबंधी पुरेशी माहिती नसल्याने पेरणीच्या खर्चात वाढ होत अपेक्षीत उत्पादन घेता येत नसल्याने शेती व्यवसाय फायद्याचा ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरत असल्याचे काही शेतकºयांचे म्हणणे आहे. याकडे जिल्ह्याच्या कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष पुरवून शेतकºयांच्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे. त्यानुषंगाने त्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका वितरित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वाशिममध्ये मृदा परीक्षण प्रयोगशाळेस शासनाकडून मंजुरात मिळाली आहे. मात्र, काही कारणास्तव ती अद्याप कार्यान्वित होऊ शकली नाही. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतातील माती करडा कृषी विज्ञान केंद्र आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील मृदा परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविली जाते. बºयाच शेतकºयांना ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देण्यात आले असून याकडे अधिक लक्ष पुरविले जाईल.- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
वाशिम जिल्ह्यात ‘सॉईल हेल्थ कार्ड’पासून हजारो शेतकरी वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 2:52 PM
वाशिम : शेतजमिनीतील माती सुपीक असेल तरच त्यातून दर्जेदार उत्पन्न घेणे शक्य आहे. यासाठीच शेतांमधील मातीचे नियमित परिक्षण करणे गरजेचे आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व त्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका अर्थात ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देणे कृषी विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने उदासिनता बाळगली असून हजारो शेतकरी अद्याप या सुविधेपासून वंचित आहेत. वाशिम जिल्ह्यात तर कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षण प्रयोगशाळा अद्याप उभारल्या गेलेली नाही.