वाशिम: बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी व उमरी खुर्द येथे रामनवमीनिमित्त दरवर्षी भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेत सहभागी होऊन सेवालाल चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविकांनी सेवागड मंदीर संस्थान ते पोहरादेवी संस्थानपर्यंत हजारो भाविकांनी पायदळ दिंडी काढली आहे. आंध्रप्रदेशातील बुट्टी बिल्लारी तालुका सेवागड व परिसरातील महिलांसह पुरुष भाविक या दिंडीत सहभागी झाले आहेत. या दिंडीचे वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून, सेवालाल पालखी सोहळ्याचे पुजन व दर्शन घेऊन दिंडीत सहभागी भाविकांना चहापाण्यासह उपाहाराचे वितरण करण्यात येत आहे. मुखात संत सेवालाल व संत रामराव महाराजांचा जयघोष करीत डफडीच्या तालावर बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य सादर करीत हे भाविक पोहरादेवीेकडे जात आहेत. हा पालखी सोहळा २ एप्रिल रोजी पोहरादेवीत दाखल झाली.
सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी हजारोंची पायदळ दिंडी
By admin | Published: April 02, 2017 4:37 PM