वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सोहमनाथ महाराजांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले. २१ ऑगस्ट रोजी नागपंचमी असल्याने श्री सोहमनाथांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. नागपंचमीच्या पावन पर्वावर विदर्भातील हजारो भाविक सोहमनाथाच्या चरणी नतमस्तक होतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यास बारसीला शेंडीने गाडे ओढून नवस फेडतात. श्रावण महिन्या मध्ये प्रत्येक सोमवारी सोहमनाथ महाराजांच्या विशेष पूजेसाठी मोठी गर्दी जमते. श्रावणमधील पहिल्याच सोमवारी याठिकाणी हजारो भाविकांनी हजेरी लावून शिस्तित दर्शन घेतले. पूजाविधी आणि दर्शन करता यावे यासाठी देवस्थानच्या चोख व्यवस्था करण्यात आली होते.
नागपंचमीनिमित्त वारुळाचे पूजनवाशिम : नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केली जाते आणि त्यांना दूध अर्पण केले जाते. यादिवशी ग्रामीण भागात सोमवारी नागपंचमीनिमित्त महिला आणि पुरुषांनीही मनोभावे वारुळाची पूजा केल्याचे चित्र जिल्हाभर पहावयास मिळाले. नागपंचमीला सापांची पूजा करण्याची प्रथा आहे. नाग हे शिवप्रभुंचा अलंकार आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केल्याने शक्ती, संपत्ती मिळते, भीती दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भावना असल्याने नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केले जाते. २१ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागात भाविकांनी बाऱ्या म्हणून वारुळ पूजन केले. लाह्या, फुटाणे, नारळ याचा प्रसाद वाटप केला.