लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करील, अशी धमकी देणा-या पटना येथील युवकाविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिम शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय मुलीची पाटणा येथील आकाशसिंग उर्फ अश्रू याच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. या कालावधीत दोघांचीही सोशल मिडीयावर चॅटींग होत असे. या चॅटींगदरम्यान पिडीत मुलीने आपले नग्न फोटो आकाशसिंग याला सोशल मिडीयावर पाठविले. आकाशसिंग याच्या सांगण्यावरून पिडीत मुलीने त्याला अनेकवेळा फोन करून त्याच्याशी अश्लिल भाषेत संभाषण देखील केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिडीत मुलीने आकाशसिंग याच्याशी फोनवर बोलने बंद केल्यामुळे त्याने मुलीला धमकी दिली की तू माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो व संभाषणाची आॅडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करतो. अशा स्वरूपाची तक्रार पिडीत मुलीने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. त्यावरून पोलीसांनी आकाशसिंग याच्याविरूध्द भादंवि कलम ३५४ (ड), ५०७, सहकलम ६६ (ई), ६७ (अ)(ब) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० क १२ पास्को अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार विजय पाटकर करीत आहेत.
नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 10:44 PM
वाशिम: तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करील, अशी धमकी देणा-या पटना येथील युवकाविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देपिडीता वाशिम येथीलपटणा येथील मुलाविरूध्द गुन्हा