मंगरुळपीर(जि. वाशिम), दि. १७ : क्षुल्लक कारणावरुन मारहाण करुन शिविगाळ केल्याप्रकरणी येथील विद्यमान न्यायालयाने तिघांना तिन महिने सक्त मजूरीची शिक्षा १६ ऑगस्ट रोजी सुनावली.फिर्यादी सुमेध नाथा पट्टेबहादूर रा.तर्हाळा यांनी मंगरुळपीर पोलिसात तक्रार दिली होती की, आरोपी आकाश खंडारे रा.तर्हाळा हा फिर्यादीच्या घरासमोर मोबाईलवर गाने वाजवित होता. फिर्यादीने मनाई केली असता आकाश खंडारे, जनार्धन खंडारे व प्रकाश खंडारे यांनी मारहाण व शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस कर्मचारी सुभाष महाजन यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. १६ ऑगस्ट रोजी प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी रोकडे यांनी आरोपीस तीन महिने सक्तमजूरी व ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. एम.जी.शर्मा यांनी काम पाहिले.
मारहाणप्रकरणी तिघांना सक्तमजुरी
By admin | Published: August 18, 2016 12:44 AM