लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथे तीन शेतकºयांच्या गोठ्याला आग लागून पाच लाख रुपयांचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १० मे रोजी सायंकाळी घडली. रिधोरा येथे अनेक शेतकºयांनी शेतात गोठे बांधून तेथे शेतीपयोगी साहित्य ठेवले जाते. १० मे रोजी रिधोरा येथील अशोकराव इढोळे, निळकंठ घुगे व अनिल इंगोले यांचे गोठ्याला आग आली. आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार रवी काळे , जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे, गोपाल उगलमुगले यांच्यासह गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. वाशिम येथून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन वाहनाचे चालक दिनकर सुरोशे, फायरमन गजानन सुर्वे, सागर निवलकर, धिरज काकडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी तीन गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून जवळपास ५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग वेळीच आटोक्याने आल्याने नजीकच्या काही गोठ्याला व शेतीपयोगी साहित्याला आग लागली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही
तीन गोठ्याला आग; पाच लाखाचे नुकसान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 4:01 PM