00
रस्ता अपूर्ण; नागरिक त्रस्त
वाशिम : केनवड परिसरातील ग्रामीण रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केनवडवासीयांनी संबंधितांकडे केली आहे.
00
शिरपुरातील भाजीपाला उत्पादक अडचणीत
वाशिम : मालेगाव तालुक्यातील तुलनेने मोठी बाजारपेठ असलेल्या शिरपूर जैन येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत आहेत. कोरोनामुळे मात्र व्यवसाय होत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
०००
हराळ येथे तीन कोरोनाबाधित
वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे २६ एप्रिल रोजी तीन कोरोनाबाधित आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून गावात सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
००००
हातपंप दुरुस्त करण्याची मागणी
वाशिम : घोटा, बेलखेड फाटा येथे प्रवाशांच्या सोयीसाठी हातपंपाची सुविधा आहे. बेलखेड फाटा येथील हातपंप नादुरुस्त आहे. हातपंप दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
00
मेडशी येथे वाहनचालकांवर कारवाई
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर सोमवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
00
जऊळका येथे प्रवाशांची गैरसोय
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून जऊळकामार्गे धावणारी पॅसेंजर रेल्वे बंद आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असून, रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.
00
रिसोड शहरात ३६ जणांना संसर्ग
वाशिम : सोमवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरात ३६ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. संबंधित परिसरातील व्यक्तींची चाचणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
००
शिरपूर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई
वाशिम : शिरपूर जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसून, गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
0००
नियमांकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष
वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासन व्यापक जनजागृती करीत आहे. त्यात अनसिंग, रिठद, काटा येथे स्थानिक प्रशासनाने सोमवारी जनजागृती केली; परंतु ग्रामस्थ नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
००००
ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन
वाशिम : कोरोना संसर्ग लक्षात घेता ग्रामस्थांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्याबाबत सोमवारी चिखली ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यात गावातील पाच प्रमुख व्यक्तींनाच बोलावून त्यांना सूचना दिल्या.
०००००
नागरिकांची कोरोना चाचणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जात आहे. सोमवारी लखमापूर, नांदखेडा परिसरात कोरोना चाचणी केली.
000
रोहित्रांना संरक्षक कठड्याचा अभाव
वाशिम : जिल्ह्यात जऊळका रेल्वे, किन्हीराजा परिसरात ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
000