लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. १९ डिसेंबरपर्यंत शासकीय कर वगळता नगरपरिषदेच्या कर विभागाने ४ कोटी रुपये कराची वसुली केली आहे.वाशिम नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत अनेकांकडे कराचा भरणा बाकी असल्याने जे वेळेच्या आत थकबाकीदार थकबाकी भरणार नाहीत अशा थकीतधारकांना जप्तीच्या नोटीसा देण्यात येणार आहेत. जिल्हयातील चारही नगरपरिषदेच्यावतीने करवसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे यामध्ये जिल्हयातील चारही नगरपालीकेत सर्वाधिक करवसुली वाशिम नगरपरिषदेने केली आहे. गतवर्षी सुध्दा ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत वाशिम नगरपरिषदेच्या करविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कसोशिने प्रयत्न केल्याने ९ कोटी रुपयांची करवसुली करुन दाखविली होती. याहीवेळी मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचा मानस मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी व्यक्त केला असून त्यासाठी करनिरिक्षक अ.अजीज अ. सत्तार, करसंग्राहक प्रयत्नशिल आहेत. वाशिम नगरपरिषदेच्यावतिने शंभर टक्के वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली असून कर भरणा करण्याचे आवाहन करण्यासाठी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच एक पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच जप्तीच्या नोटीस सुध्दा थकीत करधारकांना देण्यात येणार आहेत. थकीत कर वसुलीसाठी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांच्या पुढाकारात करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, के.आर. हडपकर, नाजिमोद्दिन मुल्लाजी, मुन्ना खान, दत्ता देशपांडे, रमजान बेनिवाले, संजय काष्टे परिश्रम घेत आहेत.
वाशिम नगरपरिषदेच्यावतिने १०० टक्के करवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सुध्दा कर विभागाला देण्यात आल्या असून नागरिकांनी कर भरुन सहकार्य करावे. कर भरणा न करणाºयांच्या घरी, प्रतिष्ठानवर तयार करण्यात येणार असलेले पथक पाठविण्यात येणार आहे. तसेच जप्तीच्या नोटीस सुध्दा पाठविण्यात येणार आहेत. या कारवाईपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी कर भरणा करावा व शहर विकासाला हातभार लावावा. करवसुलीसाठी कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी मोहीम राबविणे सुरु केली आहे.- वसंत इंगोलेमुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद
मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. दररोज कामाचा आढावा मुख्याधिकारी यांचेकडून घेण्यात येत असल्याने व त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याने १०० टक्के करवसुली नक्की होणार.- अ.अजिज अ. सत्तारकर निरिक्षक, वाशिम नगरपरिषद