लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्या वतीने बुधवार, ६ सप्टेंबरपासून येथील बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ झाला. प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तालुका कृषि अधिकारी वाळके, संस्थेचे संचालक सुरेश माहुरे उपस्थित होते. प्रशिक्षणात दहा गावांमधील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच, महिला व पुरुष शेतकºयांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी जल, जमीन, जंगल, माती, पाणी, पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जलयुक्त शिवारशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. ज्या-ज्या गावांची या कार्यक्रमामध्ये निवड झालेली आहे, त्या सर्व लाभार्र्थ्यांनी योग्य नियोजन करुन योजना चांगल्या प्रकारे राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने, वाळके यांनीही कार्यक्रमामागील हेतू विषद केला. कार्यक्रमास मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून हरिदास बन्सोड, प्रशिक्षक उज्वल बोलवार, परमेश्वर अंभोरे, जिल्हा समन्वयक किशोर राठोड आदिंची उपस्थिती होती.
तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास मालेगाव येथे प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 8:24 PM
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्या वतीने बुधवार, ६ सप्टेंबरपासून येथील बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ झाला.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार समिती व गंगासागर ग्रामसुधार संस्थेच्यावतीने प्रशिक्षणास प्रारंभ बालाजी स्वागत लॉनमध्ये तीनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास प्रारंभ