शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पंचनाम्यासाठी उरले तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:19 PM

पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागासह पंचायत विभागाची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान, पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळून ते नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत करु शकणार आहेत.जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनसह उभे सोयाबीन, तूर, कपाशी आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीत पाणीच पाणी दिसू लागले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. सुरुवातीचे दोन दिवस तक्रार अर्जांचे संकलन करण्यातच गेले, तर त्यानंतर पावसामुळे शेतशिवारात चिखल झाल्याने पंचनाम्यात अडथळे निर्माण झाले. आता ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांचे संयुक्त पथक पीक नुकसानाची पाहणी करीत आहे. जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यात १ लाख ३० हजार ७५६ शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. या शेतकºयांनी १ लाख ३७ हजा २४ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा भरला आहे, तर त्यापैकी १ लाख ९ हजार ६०६ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाबाबत अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्य ८०२ गावातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी मंगळवार ५ नोव्हेंबरपर्र्यंत प्रशासनाने ३५२ गावांतील ९५ हजारांहून अधिक शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे केले आहेत. तथापि, हे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंतचीच मुदत दिली असल्याने आता तीन दिवसांत ४५० गावांत पोहोचून पंचनामे करावे लागणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. आता तीन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला पंचनामे करावे लागणार आहेत. यात वेळ जाऊ नये म्हणून प्रशासन एका गावातील दहा ते पंधरा शेतकºयांच्या काढणी पश्चात सोयाबीनचा पंचनामा करून तो एकाच कागदावर नमूद करीत त्यावर संबंधित सर्व शेतकºयांची स्वाक्षरी घेत आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने पंचनामे झालेल्या गावांतील शेतकºयांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागांत फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे ज्या शेतकºयांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकºयांना प्रशासनाला आपल्या पीक नुकसानाबाबत अवगत करून पंचनामे करून घेता येणार आहेत.(प्रतिनिधी)शासनाच्या निकषानुसार प्रत्येक शेतकºयाच्या शेतात नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाचे पथक जात आहे. काही शेतकºयांच्या मनात सुरू असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्याबाबत संभ्रम आहे; मात्र ही प्रक्रिया निप:क्षपणे केली जात असून कुणाला काही शंका असल्यास त्यांनी पथकाला भेटून शंका निरसन करावे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे निर्धारित मुदतीत करण्यापेक्षा कोणताच नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, ही काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्यबळ अपुरे असताना नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया पार पडत आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या सुड्या पूर्णत: भिजल्या असून, अधिक दिवस उलटल्याने सुड्यांमधील हे सोयाबीन आता सडत चालले आहे. असे असताना अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याने सोयाबीन उचलावे की नाही, हा प्रश्न आहे. प्रशासनाने सोयाबीनच्या सुड्यांचा तातडीने पंचनामा करायला हवा.- शाम अवताडेशेतकरी, जोगलदरी (ता.मंगरूळपीर)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती