लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ४८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवार, २ आॅक्टोबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४४६४ वर पोहोचली आहे. दरम्यान शुक्रवावारी १०९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या अतिशय झपाट्याने वाढली. आॅक्टोबरच्या दुसऱ्या दिवशी ४८ रुग्ण आढळून आलेत यामध्ये वाशिम शहरातील एकही रुग्ण नसल्याने शहरवासियांना काही अंशी दिलासा मिळाला . शुक्रवारी रसोड शहरातील शिवाजी नगर येथील ४, समर्थनगर येथील १, कासारगल्ली येथील २, अनंत कॉलनी परिसरातील ४, माळीपुरा येथील १, पळसखेड येथील १, देगाव येथील १, मालेगाव शहरातील १, शिरपूर जैन येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, बरालिंग मंदिर परिसरातील ३, शिवाजी नगर येथील १, यशवंत कॉलनी परिसरातील २, आदर्श कॉलनी परिसरातील १, खेर्डा येथील १, धनज येथील १, धोत्रा येथील १, मंगरूळपीर शहरातील बाबरे नगर येथील १, नाथनगर येथील २, जिल्हा परिषद शाळा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, वनोजा येथील १, सनगाव येथील १, भडकुंभा येथील १, शेलूबाजार येथील २, शिवणी येथील १, पिंप्री येथील १, आसोला येथील १, मानोरा तालुक्यातील कार्ली येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०९ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६३६ रुग्ण बरे झालेत.
वाशिम जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; ४८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:14 PM