लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भुसंदर्भ कायदा कलम २८ अ अंतर्गत पूर्ण निर्धारित निवाड्यातील संपादित जमिनीची नुकसानभरपाई तत्काळ मिळावी. तसेच दिरंगाईस कारणीभूत असणाºया अधिकाºयांविरूद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी वसंतवाडी (ता.मंगरूळपीर) येथील तिघांनी सोमवार, ३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. ४ डिसेंबरला दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते.यासंदर्भात उपोषणकर्ते विक्रम भगवान चव्हाण, तारासिंग मंगू आडे आणि शेषराव राठोड यांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की उमरा कापसे लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत जमिनींचे संपादन करण्यात आले. भुसंदर्भ कायदा कलम २८ अ अंतर्गत पूर्ण निर्धारित निवाड्यातील संपादित जमिनीची नुकसानभरपाईची वाढीव रक्कम देण्यासंदर्भातील निर्णय होवून सुमारे २ वर्षे झाली असतानाही अद्याप मोबदला मिळाला नाही. त्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे उपोषणकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी तीघांचे बेमुदत उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 4:14 PM