जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अख्यत्यारीत येणाऱ्या सात ग्रामीण रुग्णांलयांसह जिल्हा सामान्य रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात सर्वसाधारण आणि गोरगरीब रुग्णांना अद्ययावत आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध तपासणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यापैकी सोनोग्राफी मशीनची स्थिती गंभीर आहे. यात तीन सोनोग्राफी मशीन बंद आहेत, तर तीन ठिकाणी ही सुविधाच उपलब्ध नसल्याचे कळले आहे.
ओपीडी कक्षाची स्थिती
जि. सा. रुग्णालय ५००
उपजिल्हा रुग्णालय ३००
-------------
जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनसह एक्स-रे आणि सोनोग्राफी मशीन आहे. या सर्व मशीन सुरु असून, संबंधित आजारी रुग्णांची त्या मशीनद्वारे नियमित तपासणी केली जाते. इतर काही ठिकाणी तज्ज्ञ उपलब्ध न झाल्याने त्याचा वापर करणे अशक्य होत आहे. याबाबत वरिष्ठस्तरावर अहवाल देण्यात आला आहे.
-डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
----------------
कोट: उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली सर्व यंत्रणा सुस्थितीत असून, त्या मशीनद्वारे आजारी रुग्णांची आवश्यकतेनुसार तपासणी केली जात आहे. तांत्रिक अडचणी आल्यानंतरच रुग्णांच्या तपासणीत खोळंबा येतो.
-डॉ. भाऊसाहेब लहाने,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
-------------------
जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती समाधानकारक
वाशिम जिह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनसह एक्सरे, सोनोग्राफी आणि इतर यंत्रे तपासणीसाठी उपलब्ध आहेत. या यंत्राचा वापर नियमित केला जातो. या ठिकाणी दाखल रुग्णांसह केवळ निदानासाठी तपासणीला येणाऱ्या रुग्णांना या यंत्रांचा लाभ होत आहे. इतर ग्रामीण रुग्णालयात मात्र कोठेही ही सुविधा नाही.
-------
स्त्री रुग्णालय कार्यान्वितच नाही
जिल्ह्यातील महिलांवर योग्य उपचारासाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महिला रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयासाठी पदभरतीला मंजुरीही देण्यात आली आणि त्यापैकी आवश्यक काही पदांची भरतीही करण्यात आली; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही स्त्री रुग्णालय जनसेवेत रुजू झाले नाही.
---------------
कोट: मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असल्याने गरोदरपणातील आवश्यक तपासणीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधला; परंतु येथील सोनोग्राफी कक्ष तज्ज्ञांअभावी बंद असल्याचे कळले. त्यामुळे आम्हाला खासगी रुग्णालयात मोठा खर्च करून तपासणी करावी लागली. गोरगरीब महिलांचा विचार करून तातडीने सोनोग्राफी कक्ष सुरू करावा.
-आरती इंगळे, महिला रुग्ण
-------------
कोट: पोटाच्या आजाराने त्रस्त असताना खासगी दवाखान्यात मोठा खर्च येत होता. त्यामुळे तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. विविध ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी कक्षाची सुविधा बंद असल्याने अखेर आम्हाला वाशिम येथे यावे लागले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर मात्र आजाराचे निदान झाले. इतरही रुग्णालयात ही सुविधा असावी.
- पद्माबाई कांबळे, महिला रुग्ण