लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हयात असलेल्या ३ मध्यम व १३३ लघु प्रकल्पात जलसाठा बºयापैकी साठल्याने जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे. तीनही मध्य प्रकल्पासह ४६ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित लघुप्रकल्पातही ७५ टक्के व काहींमध्ये यापेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाला आहे.सुरुवातील अत्यल्प पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही जिल्हावासियांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार असे चिन्ह दिसून येत होते. परंतु गत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला नव्हता.त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतांनाच गत पंधरा दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी टंचाईची चिंता दूर झाल्याचे दिसून येत आहे. े सर्वत्र जोरदार पावसााने प्रकल्प तुडूंब भरले तर नदि, नाले दुथडी भरुन वाहू लागले. शिवाय भुगभार्तील पाणी पातळीत देखील वाढ झालेली दिसून येत आहे . जिल्हावासियांना जाणवणारी टंचाई दूर झाली असली तरी या पावसाने मात्र, शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान केल्याने त्यांच्यावर आर्थीक संकट कोसळलेले दिसून येत आहे. सर्वत्र पीक काढणीच्या तोंडावर झालेल्या पावसाने पीक नष्ट होवून बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिलहयात झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प ओव्हर फ्लो तर अनेक प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असून यामध्ये प्रामुख्याने एकबुर्जी, सोनल, अडाण हे तीन मध्यम प्रकल्प तुडूंब भरले असून वाशिम तालुक्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ३० प्रकल्पांमध्ये, मालेगाव तालुक्यातील २३ पैकी २१, कारंजा तालुक्यातील १६ पैकी ६, मंगरूळपीर १५ पैकी ११, रिसोड तालुक्यातील १८ पैकी १३ तर मानोरा तालुक्यातील २५ पैकी १० प्रकल्प अशा एकूण १३३ लघु प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आजमितीला उपलब्ध झाला आहे.
वाशिम जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 3:11 PM